Ticker

6/recent/ticker-posts

Healthy tips for adults 2021

आरोग्यम धनसंपदा अर्थात
"आपणच आहोत आपल्या आरोग्याचे शिल्पकार"Healthy tips for adults 2021
 "आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची," एक परिसंवाद.


नुकतेच मुंबईतील नव्हे"तर (भारतातील)येथील प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टराचें व्याख्यान ऐकण्याचा योग आला.व्याख्याते डॉक्टरांनी दोन अडीच तासात श्रोत्यांच्या मनाचा केव्हाच ठाव घेतला ते कळले सुद्धा नाही. त्या देव दुताला माझा पहिला सलाम.
त्यांच्या व्याख्यानातील (आपल्या आरोग्यासाठी) काही ठळक माहिती


सकाळी उठल्यावर अंशपोटी  कोमट पाणी प्यावे. (सध्या जे आपण पाणी पितो ते गणक यंत्रा नुसार तितकेसे योग्य नाही. माठातील पाणी गाळून गरम करून घ्यावे.) पंधरा मिनिटांनी न्याहारी साठी भाजी चपाती,भाकरी घ्यावी.नंतर चहा घ्यावा.दुपारच्या जेवणा दरम्यान साधा अल्प आहार करू शकता.भूक लागली म्हणून काहीही खाऊ नका.


बाहेरचे पदार्थ उदा.वडापाव,समोसे,पिझ्झा,बर्गर, बेकरीचे पदार्थ ,खारी ,टोस्ट,तेलकट,आंबट,अतिगोड, केक ,आईस्क्रीम,मैद्या पासून साखरेपासून बनविलेले पदार्थ खाऊ नयेत.


मांसाहारी पदार्थ कमी प्रमाणात खावेत.चिकन, मासळी दुपारच्या  जेवणात असावी.ब्रायलार चिकन आरोग्याला अगदी घा ताक आहे.  ते त्वरित बंद करा.गावठी कोंबडीचे चिकन घ्यावे .मासळी फ्राय न करता ओली आमटीच अधिक  प्रमाणात करावी .रात्री मांसाहार टाळावे.मटण खाते वेळी सर्व सामान्य प्रकृतीच्या माणसांनी कमीत कमी खावे.कारण त्यात चरबी मोट्या प्रमाणात असते.हृदय रोग,ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी मटण खाऊच नये.खावेसे वाटल्यास दुपारच्या जेवणात अगदी अल्प प्रमाणात आमटी (तिखट डाळ)सोबत जेवावे.  मोड आलेल्या कडधान्यांचा वापर अधिक प्रमाणात करावा सामान्य माणसांनी सुद्धा अशा पद्दतीचा आहार घ्यावा.आपले वजन आहार तक्त्या नुसार असावे.स्तुल पणा असेल तर विना चपला हिरवळीवर अथवा सामान्य रस्त्यावर कमीत कमी ४० मिनिटे चालावे. त्यामुळे वजन कमी होईल. शीत पेये,कोल्ड्रिंक्स पिऊच नये.पचनक्रिया मंदावते.आरोग्याबाबत धोक्याचा इशारा म्हणजे 'ऍसिडिटी' . 


आपण पाट्यांमध्ये,कार्यक्रमात  काहीही खातो आणि लिव्हरला डॅमेज करू शकतो हे तुम्हाला माहीत आहे काय! सुरवातीला जळजळ सुरु होते. छातीत दुखते,पाठीत भरते. नंतर समजते कि ऍसिडिटी झालीय.  नंतर कळते की ह्रदयाला व लीव्हरला धोका . सद्या तरुण पिढीला बाहेरचे खायचे व्यसन लागलेय. दारू,धूम्रपान या सारख्या आहारी गेलेत.


आपल्या  आरोग्याच्या दृष्टीने कुटुंबालाच  जर खड्ड्यात घालायचे नसेल तर प्राचीन ऋषी मुनींपासून आलेली पारंपरिक पद्धत का अवलंबत नाही. आधी आहार आणि विहार आचरणात आणा.दुपारच्या जेवणा नंतर तासाभराने थोडा वेळ झोपा. रात्री लवकरात लवकर जेवा. आणि २ तासांनंतर झोपा .रात्रीचे जेवण कमी जेवा. ऍसिडिटी होणार नाही. रात्री जेवल्यावर मोबाईलवर  अधिक वेळ घालवू नये.चॅटिंग,नेट फक्त रात्री ११ पर्यंतच.सकाळी उठल्यावर उत्साह  वाटेल.असे विज्ञान परीक्षणातुन निष्पन्न झाले आहे की,बऱ्याच प्रमाणात आजार हे मोबाईलमुळे (रात्रीच्या जागरणामुळे) वाढले आहेत.डोळ्यांचे आजार,डायाबीटीजचे ब्लडप्रेशरचे वाढते प्रमाण, हे याचेच संकेत देतात. सगळ्यात महत्वाचे जाणून बुजून जागरण टाळा. आपण माकडाचेच वंशज आहोत ना! मग त्यांचे थोडे तरी अनुकरण केले पाहिजे.जेवणापूर्वी सलाड अर्धा तास अगोदर खाल्लेच पाहिजे.बटाटा,टोमॅटो, अगदी बंदच करा . आरोघ्याला घातक आहेत.सर्व प्रकारच्या  पालेभाज्या,फळे पेरू,सफरचंद,इत्यादी गोष्टी रोजच्या आहारात हवीत.पण  भूक लागल्यास वडापावच्या बदली फळे (धुऊन) खावीत .पालेभाज्या सुद्धा मिठाच्या पाण्यात काही वेळ ठेऊन धुऊन चिराव्यात. कारण त्यांच्यावर बऱ्याच प्रमाणावर केमिकल्स खत  मारलेले असते.


आत्ता थोडे आध्यत्मिक  आणि सांगीतिक गोष्टींकडे वळू या.जेणे करून आपला दिवस भराचा ताण कमी होईल.  जमल्यास सकाळीच उठा.६-३०च्या  सूर्योदयाकडे किमान ५ मिनिटे पाहत राहा.चांदोबा फक्त अंगाईत राहिला.थोडे बाहेर या त्याच्याकडे सुद्धा कटाक्षाने पहात राहा.डोळ्यांसाठी ते उपयुक्त आहे.


राग म्हणजे तो राग नाही.शास्त्रीय संगीतातील राग, भीम पलासी,मालकंस हे राग सकाळी काही वेळ हेडफोन वर ऐका. आपण या हिंदुस्तानात  (भारतात )जन्मलो.आपली नाळ या संस्कारांशी जोडली गेली आहे.असे म्हणतो. फक्त बोलून चालणार नाही.जोडली गेलीच पाहिजे.खरे तर इथेच आरोग्याचे गमक आहे.संध्याकाळी घरी आल्यावर आपण थकलेले असता तेव्हा एखादया खोलीत किंवा कोपऱ्यात मंद प्रकाश करावा. आणि १०ते१५ मिनिटे हात पाय धुऊन शांत बसून राहावे.व नंतर(# चहा टाळावी)नास्ता पाणी बाकीची कामे करावीत. मनशांती काय ते तेव्हा कळेल.रात्री झोपताना मोबाईलचा वापर असा करावा कि व ओंकार मंत्र (युट्युब )डाउनलोड करून घ्या.फक्त ५मिनिटे हेडफोन लावून ऐका.येथेच मिळेल दिवसभराच्या ताणतणावा पासून खरी  मुक्ती आणि शक्ती. आपण सगळे तसे सुज्ञच असतो.कळते, पण तेव्हा वेळ गेलेली असते.फक्त एवढे लक्षात ठेवणे आपण असलो तर आपल्या घरचे सुखी..

टीप: तळलेले  पदार्थ,अतितिखट,अति आंबट,लोणचे-पापड खाणे टाळावे.

       मित्रानो ''तुमचे आरोग्य चांगले तरच आपले कुटुंब खऱ्या अर्थाने सुखी'' हे सर्वात आधी लक्षात ठेवा.


अनुवाद : (भाषण)  लेखक - रघुवीर सखाराम चव्हाण. स्वतः छायाचित्रकार असून विविध वृत्तपत्रांमधून  लेख प्रसिद्ध झाले आहेत.

Post a Comment

0 Comments