Ticker

6/recent/ticker-posts

श्री स्वामी समर्थ

  ।। श्री स्वामी समर्थ ।।श्री स्वामी समर्थ
सर्वांनी "देऊळ बंद"चित्रपट बघितलं असेल, पण त्यातून घेतलं काय???
चला स्वामींनी बोललेले मानवी जीवन सुखकर करणारे काही अमृततुल्य वाक्यांवर नजर टाकु

१. चुकून या पादुका खाली ठेवल्या ना.! तर तुझ्या विज्ञानाच्या रांगा लागतील दर्शनाला.!!

२. सिग्नल तोडणाऱ्या व्यक्तिने दिवसातून चार चार वेळा माझ्या आरत्या केल्या, तरी मी त्याच्या पाठीशी उभा राहत
 नाही, पण जो प्रमाणिक आहे भले तो नास्तिक असेल मला मानत नसेल तरी मी त्याच्या पाठीशी सदैव उभा असतो. म्हणूनच म्हटलं सिग्नल पाळ मी तुझ्या पाठीशी आहे.!!

३. रोज पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा दिवा मीच लावलाय.!!

४. तुझी नास्तिकता ही तुझ्या तिरस्कारातुन निर्माण झाली आहे.

५. मी कोणाच्या मागे लागत नाही पाठीशी उभा राहतो

६. जन्म आणि मृत्त्यु च्या फेऱ्यात ढवळा ढवळ करण्याचा अधिकार मलाही नाही.!!

७. माणसाचं शरीर म्हणजे चुंबक आहे आणि ते फक्त दक्षिण उत्तर स्थिर राहतं . दक्षिणेकडे पाय करुण झोपल्यास
 रक्तप्रवाह उल्टा होतो, म्हणून आमचं अध्यात्म सांगतं मेलेल्याचे पाय दक्षिणेकडे ठेवावे जीवंत माणसाचे नाही..

८. तुझी बुद्धी तू या देशाच्या संरक्षणासाठी वापरतो आहेस म्हणून मी तुला दिसतोय.

९. परमेश्वर ही बघण्याची नाही जाणून घेण्याची गोष्ट आहे..

१०. तुझं विज्ञान हे जग कसं निर्माण झालं ते सांगत असेल, तर माझं अध्यात्म हे जग का निर्माण झालां हे सांगतं..!!

११. असे देऊळ लुटणारे, देऊळ बंद करणारे लाखो लोक या देशात आले आणि गेले. पण ...
देव होते ! देव आहे !! आणि देव राहणारच.!!!

१२. सेवा करा सेवेकरी व्हा.! माणूस जपा माणूस शिका.!! कारण परमेश्वर हा माणसातच आहे..!!

🙏 श्री स्वामी समर्थ🙏

Post a Comment

0 Comments